मी, नृत्यकला आणि बॉलिवूड
माझ्या मते मूल जन्माला येतेच तेच नृत्य करत येते. या जगात प्रवेश करताच हातपाय हलविण्याची क्रिया त्याची निसर्गतःच होत असते आणि नृत्यातही नेमके हेच घडत असते. फक्त त्या हातपाय हलविण्यात एक लयबद्धता येते, नियोजन येत जातं इतकंच.
मला जितकं आठवतंय त्यानुसार मी अंदाजे पहिल्या किंवा दुसऱ्या इयत्तेत असेन, १९७९ ला सरगम चित्रपट आला आणि त्या चित्रपटातल्या डफलीवाले या जयाप्रदा यांच्यावर चित्रित गीतावर मी नृत्य करायला लागले आणि माझ्या नृत्यकलेचा श्रीगणेशा झाला. त्या दिवसापासून सिनेचित्रपटसृष्टीशी म्हणजेच बॉलीवूडशी माझं नातं पक्क झालं.
काय नाही दिलं या बॉलिवूडने मला. सुंदर आणि पवित्र अशा नृत्यकलेशी नाळ जोडली ती या बॉलिवूडमुळेच. रितसर शास्त्रीय शिक्षण (भरतनाट्यम) शिकायला सुरुवात वयाच्या बाराव्या वर्षी झाली. आजकालच्या मुलांच्या तुलनेत तशी उशिराच झाली. ते सुद्धा आमच्या शाळेत नृत्यवर्ग सुरु झाल्यामुळे नाहीतर अजून किती वर्षे लागली असती कुणास ठाऊक. त्या काळात हल्लीच्या पालकांप्रमाणे तितकीशी जागरुकता नव्हती. पण तरीही शाळेत सुरु झालेल्या नृत्यवर्गात पाठवायला आईवडिलांनी कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत. कारण त्यांनी माझ्या नृत्याचे वेड बघितलेले होते. आई पप्पा तसेच समोरच्या काकू, शेजारचे सांगतात की तू रेडिओवर गाणी लागली की सतत नाचतच असायती. मला सगळे भिंगरी म्हणायचे महिना तीस रुपये फी भरून गुरु डॉ. किशूपाल यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याच्या या अथांग सागरात माझा भरतनाट्यमचा नृत्यप्रवास सुरू झाला परंतू यामुळे बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्य करायचे वेड काही कमी झाले नाही. उलट ते दिवसागणिक, वर्षांगणिक वाढतच गेले. मी, माझे नृत्य आणि बॉलिवूड या तिघांचे नाते अगदी घट्ट झाले.
बॉलिवूडने नुसती नृत्यकलाच दिली नाही तर जगण्याची कलासुद्धा दिली हे अतिशय महत्त्वाचे. या बॉलिवूडची भूरळ माझ्यासारख्या लाखो नृत्यांगणांना पडली असेल आणि पडतही राहील. या भरभरून जगायला प्रवृत्त करणाऱ्या बॉलिवूड जगतातल्या काही तारकांच्या, गीतांचा आणि नृत्यांचा माझ्या आयुष्यावर पडलेला प्रभाव आणि त्यांचे महत्त्व इथे सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे...
all the best for this journey...keep writing
ReplyDeleteThanks a lot for your wishes. We are motivated with your comments. Keep reading our blog.
DeleteHey Hi,
ReplyDeleteHeartly congratulations dear.....
Thanks a lot for your wishes. We are motivated with your comments. Keep reading our blog.
DeleteCongratulations
ReplyDeleteThanks a lot. Keep reading and give us feedback.
Deleteखूप छान कविता दी, आज तू कित्येकांचा आदर्श आहेस, कामावर जाणाऱ्या बायका, गृहिणींसाठीं नृत्याचे क्लास घेणारी तू पहिलीच असशील त्यावेळी, जेव्हा तू ही आयडिया आणलीस. मी दहावीला होते तेव्हा महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक बातमी वाचली होती. की कश्यपद्धतीने तू झपातल्यासारखं ज्यांना लहानपणी डान्स नाही शिकता आला, परिस्थिती, जबाबदारी, मुले, या सगळ्यात अडकून ज्यांना नृत्याला टाटा बाय बाय केलं त्यांना तूझ्या रूपाने पुन्हा स्वतःला शोधण्याची संधी मिळतेय हे त्या पेपर मध्ये दिल होत, वर्ष होत 2004 च. मी तेव्हा पासून तुझी फॅन आहे, त्यानंतर योगायोगाने सांस्कृतिक संचालनालयाच्या कार्यालयात भेट झाली, आणि त्यानंतर तर तू माझी कविता दी झालीस, काही माणसं आपल्या आयुष्याच्या friend list मध्ये असल्याचा आनंद वेगळाच असतो. तुला हवं ते सगळं मिळो....
ReplyDeleteप्रिय मयुरी. खूप खूप धन्यवाद इतकं सुंदर शब्दात व्यक्त झाल्या बद्दल. पण मनापासून सांगते आपण स्त्रिया आपल्या कलागुणांना आणि आवडीला नेहमी दुय्यम स्थान देतो आणि मग आयुष्यात खूप गोष्टी करायच्या राहून जातात याच भावनेने हे सगळं मी करत आले आणि करतेय. जेंव्हा तुझ्या सारखी सखी अशी कौतुकाची थाप देते तेंव्हा अजून स्फूर्ती येते. तूही माझ्या आयुष्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये कायमची फिट झाली
DeleteSuperb
ReplyDeleteChildhood memories wowwww.... they carve your soul;they mould your being; their force has an impact greater than other memories. So you kavita you made me remind my childhood too. You are the one who expresses one's self through Dance. Kavita turned her CAN'T INTO CANS,and her DREAMS INTO PLANS. I NEVER LOSE EITHER I WIN OR I LEARN this is what I have observed. She never give up .Dance is an beautiful Art more than what you see,its about what you make others see.A good Dancer, an excellent choreographer, a genius teacher and a good human being are Athletes of God and you are the one kavita. What is hard today, will one day be your warm up these are your words conveyed to your students. I would like to many many thanks to you for always listening to me, supporting and encouraging me. You are a true friend, and I love and appreciate you. YOU ARE THE BEST!!!!
ReplyDeleteThanks a lot. We are really honored with these kind words. it is really motiovating. Keep reading and send us feedback.
DeleteThanks a lot. We are really honored with these kind words. it is really motiovating. Keep reading and send us feedback.
DeleteThanks Kavita for starting this blog. It will be wonderful to know your experiences & dance journey. Keep on inspiring all of us.
ReplyDeleteThanks for sharing your views. Your appreciation will definitely help to write even better.Keep reading and sharing your feedback.
Deleteकविता सर्व प्रथम तुझे खूप खूप अभिनंदन.. तुझे नृत्यासबंधी विचार आम्हाला रोज वाचायला मिळणार हे आमचे भाग्यच समजतो. त्याचबरोबर सरगम चित्रपटाचे निर्माते आणि जयाप्रदा ह्यांचे आभार कारण तेव्हापासून तू नृत्याचा श्रीगणेशा केलास आणि आम्हाला सर्वगुणसंपन्न नृत्यांगना मिळाली.
ReplyDeleteज्या passion ने तू नाचतेस आणि ज्या तळमळीने नाच शिकवतेस त्याबद्दल तुला Hatts Off..
तुझं भाषेवरचं प्रभुत्व तुझ्या लेखांमधून दिसून येतय... अशीच लिहीत रहा आणि आम्हांला मेजवानी देत रहा...
Thanks for sharing your views. Your appreciation will definitely help to write even better.Keep reading and sharing your feedback.
Delete