माझ्या मनातली जयाप्रदा...
सरगम चित्रपटाचा आणि माझ्या नृत्यकलेचा खूप जवळचा संबंध आहे. डफलीवाले डफली बजा... आणि परबत के इसपार... या दोन्ही गीतांनी माझी नृत्यकला जन्माला आली आणि पुढे पुढे ती बहरतही गेली. दूरदर्शनच्या छायागीतमध्ये ही गाणी जेव्हा जेव्हा लागायची तेव्हा तेव्हा त्यातल्या स्टेप्स बघून करायचा माझा प्रयत्न असायचा. आईवडिलांना या गोष्टीचं कोण कौतुक असायचं. जयाप्रदा या दाक्षिणात्य अभिनेत्रीचा हा पहिलाच चित्रपट. कसली सुंदर दिसत होती ती या चित्रपटात. धारदार नाक आणि सुबक चेहेऱ्याच्या या अभिनेत्रीने नृत्याबरोबरच तिच्या सौंदर्याचीही भूरळ घातली होती. आजही ही गाणी ऐकली की मन त्या काळात जाऊन रमतं.
आमचं परळगाव म्हणजे खरंच गावासारखं होतं. बिल्डिंगचा फारसा मागमूस नव्हता. बैठी एक मजली कौलारु घरं, वेगवेगळ्या आळ्या, देवळं आणि भरपूर लहान मुलं. सर्व सण अगदी गावासारखे साजरे होत. रामनवमी, हमुमान जयंतीला पालखी येत असे, जी अजूनही येते. सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक पूजा यांचे विशेष कौतुक, सार्वजनिक गणेशोत्सव तर आम्ही लहान लहान मुलांनी एकत्र येऊन सुरु केला होता ज्याचे आज स्वरुप खूप मोठे झाले आहे आणि या सण-समारंभात माझा डफलीवाले या गीतावरचा नृत्याविष्कार हमखास ठरलेला असायचा. कित्येक वर्षे नाचत होते मी या गाण्यांवर. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधुर संगीताने समृद्ध असलेल्या सरगम या चित्रपटाने जयाप्रदासारखी अभिनेत्री दिली. दिसायला सुंदर आणि नृत्यातही तितकीच तरबेज. पण तरीसुद्धा तिला म्हणावे तसे नृत्यप्रधान चित्रपट मिळाले नाहीत असे मला वाटते. काही चित्रपट वगळता तिची ही नृत्यकला चित्रपटातून फारशी दिसली नाही किंवा तिचे चित्रपट नृत्याकरीता फारसे गाजले नाहीत.
तोहफा चित्रपटात शेकडो साड्यांच्या सेटवर तिला वेगवेगळ्या सांड्यामध्ये नाचताना बघायला खूप छान वाटले होते. मला विचाराल तर तिचे सौंदर्य साडीमध्ये अधिक खुलून दिसायचे. मध्ये भांग असलेली सैलसर वेणी, वेणीला खाली गोंडा आणि भरपूर गजरे किंवा कानाच्या मागे फुले, कानात झुमके...खूप आवडायचा मला हा पेहराव. लांब केसांची फॅशनच आली होती त्यामुळे. अशी ही जयाप्रदा तिच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि अर्थातच नृत्याने माझ्यासारख्या बऱ्याच सखींना त्या काळात भूरळ घालत होती आणि आजही त्याच गारुड कायम आहे.
Yes I still remember... Dafliwale song aani sahakar chya terrace var cha aapla dance.... Kharatar toch pahila platform hota aapla...
ReplyDeleteAani ekda Laxmikant Pyarelal yanchya kadun chakk bakshicha chi pavati milaleli aaplyala lahanpani... Aathavtey??? Jayaprada... De de pyar de he gaan lagel ki sudha tu khup sundar dance karaychi... Kitti vela pahile la Sharabi movie.... Simply great actress...
Thanks for sharing your feedback and journey with Kavita Dance Academy. The memories are always cherished with the besties. Thanks for sharing your feedback. Keep reading.
DeleteHi Kavita,khup aashirvad, kase aahaat? Nrutya barobar lekhanichahi Sunder avishkaar disala, khup chaan,keep it up,take care,god bless
ReplyDeleteYes. Thought of penned down the experiences and the journey of dance. Thanks a lot for your wishes.
Deleteअभिनंदन ताई, खरे आहे, जयाप्रदा आणि श्रीदेवी ह्या दाक्षिणात्य अभिनेत्रींनी एक काळ त्यांच्या सौंदर्य,अभिनय आणि नृत्यकौशल्याने गाजवला होता.वैजयंतीमाला,वहिदा रेहमान,हेमामालीनी आणि रेखा नंतर ह्या दोघींच्या चित्रपटांची रांग लागली होती.आणि त्या चित्रपटातील नृत्य पाहणे ही एक पर्वणी होती.माझी नृत्याची आवड सुध्दा दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचा चित्रपट चांदनी ह्यातील मेर हाथों में नौ नौ चुडीयाँ ह्या गाण्यामुळे झाली.खुप धन्यवाद ताई की ह्या ब्लाॅगमुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
ReplyDeleteGod bless you ma'am❤️
ReplyDeleteThanks a lot. Keep reading and send us feedback
DeleteNice to know about your childhood memories.
ReplyDeleteThanks for the feedback, keep reading and writing your views
Delete