Monday, 18 May 2020

सौंदर्याचं ऐश्वर्य

आखीव रेखीव सौंदर्याचं उदाहरण म्हणजे ऐश्वर्या. असं म्हणतात ना भगवानने तुम्हे फुरसत से बनाया होगा, हे तिला अगदी तंतोतंत लागू पडतं. नाकी डोळी नुसती छान नाही तर सुंदर, अप्रितम आहे ती, चेहऱ्याच्या प्रत्येक छटा अगदी कोरल्याप्रमाणे. जसा मुर्तिकार एखादी सुंदर मूर्ती घडवतो त्याप्रमाणे... अशा नीलकमलनयनी सौंदर्याची मोहिनी संपूर्ण विश्वालाच पडली नसती तर नवल होतं. १९९४ साली विश्वसुंदरी हा किताब मिळालेली ऐश्वर्या सौंदर्य जगतात कायम पहिल्या क्रमांकावर राहिली.
लहानपणी शास्त्रीय गायन आणि भरतनाट्यम नृत्यकलेचे धडे गिरवणाऱ्या ऐश्वर्याला आधी डॉक्टर व्हायचं होतं आणि पुढे आर्किटेक्ट बनायचा विचारही केला होता. परंतू हळूहळू तिचे मन मॉडेलिंग करण्यावर आले. सुरुवातीच्या काळात इंटरनॅशनल सुपर मॉडेल कॉण्टेस्ट जिंकल्यानंतर ती मॉडेलिंग क्षेत्रात स्थिरावू लागली. बराच काळ मॉडेलिंग केल्यानंतर १९९७ साली मणिरत्नमच्या इरुवर चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हिंदीतला पहिला चित्रपट हा बॉबी देओलबरोबरचा और प्यार हो गया हा होता. त्यानंतर एकापेक्षा एक दर्जेदार दिग्दर्शकांच्या चित्रपटांची तिच्याकडे लाईनच लागली. हम दिल दे चुके सनम, देवदास, गुजारिश अशा अनेक चित्रपटात तिचे सौंदर्य अधिकाधिक खुलूनच दिसले होते.
हम दिल दे चुके सनम मधले मनमोहिनी हे तिच्यासाठी रचलेले गाणे अगदी परफेक्ट आहे. सौंदर्य, अदा आणि नजाकत या गोष्टींचा संगम तिच्या नृत्यांमध्ये दिसून येतो आणि मग ती नृत्ये पुन्हा पुन्हा बघावीशी वाटतात. सुरुवातीच्या काळातील तिची नृत्ये आणि त्यातील एकूणच तिचा वावर तांत्रिकदृष्ट्या चोख असला तरी त्यावर मॉडेल ऐश्वर्याचा अधिक पगडा दिसून येतो. त्यानंतर हळूहळू तिच्या नृत्यांमध्ये जिवंतपणा जाणवू लागला. या जिवंतपणाचं श्रेय अर्थ्यातच तिच्या मेहनतीला द्यायला पाहिजे. कारण कित्येक कलाकार तांत्रिकदृष्ट्या काम चोख केल्यावर त्यातच समाधान मानतात पण ती कायम तिच्या कामात सुधारणा करत राहिली. और प्यार हो गया मधील थोडा सा पगला थोडा दिवाना या गाण्यातील तिचं नृत्य पाहा आणि कजरा रे मधील तिचं नृत्य पाहा, मग हा फरक लगेच लक्षात येईल.
तिच्या अनेक नृत्यांवर मी स्वतः तर नृत्य केलंच आहे पण विद्यार्थीनींवरसुद्धा बसवली आहेत. ढोली तारो, मनमोहिनी तेरी अदा, सिलसिलाँ ये चाहत का, डोला रे डोला, निंबुडा निंबुडा इत्यादी. तिची अनेक नृत्ये मनाला भावली आहेत. हम दिल दे चुके मधील प्रत्येक गाण्यातला तिचा अभिनय अगदी लाजवाब होता. त्यातील निंबुडा निंबुडा हे गाणं तर माझ्या अतिशय जवळीचं. तिच्या नृत्यांमध्ये तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या वेगवेगळ्या अदा आपल्या मनाचा ठाव घेतात. याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे ताल सिनेमा आणि त्यातील सर्व नृत्ये.
बदलत्या काळात नृत्यांमध्ये स्टंटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि या स्टंटमध्येही ऐश्वर्याने स्वतःला चपखलपणे बसविले. तिच्या कमनीय बांध्यामुळे ते स्टंट आणि ती नृत्ये नेत्रसुखद अनुभव देतात. धूम २मधील सगळीच नृत्ये पाश्चिमात्य धाटणीची होती पण त्यातही तिने धम्माल उडवून दिली. ती एक अष्टपैलू नृत्यांगणा आहे. दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला असला तरी दहा वेळा त्याकरीता तिला नॉमिनेशन मिळालेले आहे. २००९ ला पद्मश्री या गौरवपूर्ण पुरस्काराने सन्मानित झाली आहे. २००३ साली कान्स फिल्म फेस्टिवलच्या ज्युरीची सदस्य बनणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री होती. २००४ साली लंडनमधील मादाम तुसाद इथे तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला.
२००५ साली नेदरलॅण्डला हजारो वेबसाईट आणि इंटरनेट पोलच्या मतांनी तिला जगातील सर्वांत सुंदर स्त्री म्हणून घोषित केले आहे.
अशा जागतिक स्तरावर भारतीय सौंदर्याला वाखाणल्या गेलेल्या या आपल्या ऐश्वर्याला माझे प्रेमरुपी आलिंगन.

7 comments:

  1. Yes so true Aishwarya Rai a biggest celebrity plus a daughter in law of Amitabhji a big hit.she is one of beautiful lady in the world. Bhagwan ne isse phursat se banaya hai.All her songs are super hit. Always loved dancing on her song specially dolare Dola.

    ReplyDelete
  2. Ani ho khup mastttt lihites ga. Kevdhe efforts pratek celebrity var lihayche tyanchya personal life ani professional life baddal shabd ni shabd agdi mojkya ani nivduk shabdat saglya bhavana vyakt kelya ahet hey kahi khayche kaam nahi. Pratekalach ase lihine nahi jamat hi pan ek Kala ahe. Great go ahead and keep it up dear.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for the appreciation. Your comments are really motivating. We truly appreciate your response. Thanks a lot and keep reading.

      Delete
  3. १९९४ च्या पूर्वाधात मिस युनीव्हर्स सुश्मिता सेन निवडली गेली आणि जागतिक पातळीवर भारताला एक बहुमान मिळाला, आणि ऊत्तरार्धात मिस वर्ल्ङ म्हणून ऐश्वर्या रायची निवड झाल्याने भारताच्या शिरोपेचात आणखी एक तुरा खोवला गेला.ती पाहताच बाला कलेजा खलास झाला ही ऊक्ती ऐश्वर्याला तंतोतंत लागू पडते.आरसपाणी व नखशिखान्त सौंदर्य लाभलेल्या ऐश्वर्याची चित्रपट वाटचाल सुरू झाली.पहिला सिनेमा "और प्यार हो गया"झळकला.चित्रपट म्हणावा तसा चालला नाही,पण त्यातील गाणी व पहिल्याच चित्रपटातील ऐश्वर्याचा आत्मविश्वासपूर्ण वावर व नृत्य लक्षात राहिले.तिचा एक चाहता वर्ग तयार झाला.त्यानंतर आला संजय लीला भन्साळीचा "हम दिल दे चुके सनम".सलमान खानने अभिनयाच्या नावाखाली केलेल्या अचकट विचकट हावभावाचा समीर,अजय देवगणचा संयमी आणि करारी वनराज आणि पूर्वाधात अवखळ, खोडकर पण उत्तरार्धात तेवढीच शांत नंदीनी ऐश्वर्याने साकारली. चित्रपट व गाणी सुुपरहिट. मनमोहीनी,ढोली तारो ढोल बाजे व निंबुडा निंबुडा ह्या गाण्यांना सरोज खानरुपी परीस स्पर्श लाभल्याने त्यावरील नृत्ये हि सुपरहिट.ऐश्वर्याला पहिलावहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.पाठोपाठ सुभाष घईंचा म्युझिकल हिट "ताल"झळकला.घईंनी निसर्ग सौंदर्य व ऐश्वर्याचे सौंदर्य यांचा छान मिलाप घडवून आणला होता.सिनेमाच्या कथेत जरी जीव नसला तरी त्यातील गाणी व त्यावरील शामक दावरचे नृत्यदिग्दर्शन असलेली एरोबिक्स किंवा फ्री स्टाईल प्रकारात मोडणारी नृत्ये हिट झाली व ऐश्वर्यानेही ती समरसून साकारली.हळूहळू चित्रपट सृष्टीत तिचा जम बसू लागला.यश चोप्राच्या"मोहोबत्ते"पण तिने केला.पण अमिताभ व शाहरुखच्या भूमिकेच्या तुलनेत तिला खुप कमी वाव मिळाला.सौंदर्यस्पर्धेतून बर्याच मोडेल चित्रपटसृष्टीत आल्या पण त्यातल्या सगळ्यांनाच यश मिळालेच असे नाही.झीनत अमान,जुही चावला नंतर ऐश्वर्या अशी अभिनेत्री होती जिचे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले.दरम्यानच्या काळात तिने तद्दन व्यावसायिक सिनेमे केले पण ते फारसे यशस्वी ठरले नाहीत.अगदी आर.के.बॅनरचा "आ अब लौट चले"सुध्दा नाही चालला.मग तिने हिंदी सोबत दक्षिणात्य चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.तिथेही तिला यश मिळाले.पण हिंदीमधील तिचे स्थान डळमळू लागले,आणि त्यातच तिचे विवेक ओबेराॅय व सलमान खान प्रेम प्रकरण गाजू लागले.तिच्या चित्रपटाऐवजी तिच्या ईतर गोष्टींची चर्चाच जास्त रंगू लागली.नवोदीत अभिनेत्रींचा उदय होत होता.ऐश्वर्या मागे पडते की काय असे वाटत असतानाच संजय लीला भन्साळीचा "देवदास"आला.प्रचंड भव्यदिव्य सेट व समोर जॅकी श्राॅफ,शाहरुख,माधुरी सारखी तगडी फौज.भन्साळीने मूळ कथेत बदल करत देवदास साकारला. चंद्रमुखी व पारोची भेट घडवूनच तो थांबला नाही तर त्यात व्यावसायिकता आणून दोघींचे एकत्रित नृत्यही आणले.पंडीत बिरजू महाराज व सरोज खान दिग्दर्शित सर्वच नृत्ये व गाणी तुफान यशस्वी झाली."बैरि पिया"ह्या गीतात तर शांताराम बापूंच्या "नवरंग"मधील संध्याजींवर चित्रीत झालैले "आधा है चंद्रमा"ह्या गाण्याचा फील आणला.माधुरीसारख्या कसलेल्या अभिनेत्री व नृत्यांगनेसमोर ऐश्वर्या कुठेच कमी पडली नाही.म्हणूनच की काय फिल्मफेअरची बाहुली दुसर्यांदा तिच्या पदरात पडली.मध्यंतरीच्या याळात तिने हाॅलीवूडचे हि चित्रपट केले.बघता बघता २००६ उजाडले व धूम-२ रिलीज झाला.सोबत ह्रतिक रोशन. चित्रपट सुपरहिट झाला व त्यातील ईतर गाण्यांसोबत ऐश्वर्यावर चित्रीत झालेले "क्रेझी किया रे" हे नव्या स्टाईलचे नृत्य हि हिट.२००७ उजाडले आणि ऐश्वर्या अमिताभ-जया सुपुत्र अभिषेक सोबत ती विवाहबध्द झाली.तिच्या चाहत्यांची घोर निराशा झाली.अभिषेक नावाच्या ओरांग ओटांग सोबत तिने का लग्न केले हा तिच्या चाहत्यांना पडलेला अनुत्तरीत प्रश्न आहे.लग्नानंतर तिने काही निवडक चित्रपट केले त्यात मणीरत्नमचा गुरू,आशुतोष गोवारीकरचा महत्वाकांक्षी जोधा अकबर,गुजारीश,रजनीकांत सोबतचा रोबोट यांचा समावेश होतो.बंटी और बबली नामक तद्दन भिकार चित्रपटातही तिने वैभवी मर्चंटच्या नृत्यदिग्दर्शनाखाली सासरे अमिताभ व नवरा अभिषेक सोबत "कजरा रे"हे आयटम नृत्य केले व ते खुपच गाजले. पाठोपाठ श्रीदेवी निर्मित शक्ती मध्ये सुध्दा "इश्क कमिना" हे गाण तिने केले.मातृत्वाची चाहुल लागल्यानंतर थोडा काळ ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली.नाही म्हणायला कान्स सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,सौंदर्यस्पर्धा ह्यात तिची हजेरी असायची.कालांतराने आलेले जज्बा,सरबजीत व अलीकडचा ऐ दिल है मुश्कील हे तिचे चित्रपट समीक्षकांनी ही गौरविले. पण चाहत्यांच्या मनातील ही सौंदर्यसम्राज्ञी काळाच्या ओघात कुठेतरी लुप्त होते आहे असे वाटते.तिने त्याच जोश आणि आवेशात परत चित्रपटात पुनरागमन करावे हिच तिच्या चाहत्यांची तिच्याकडे अपेक्षा..

    ReplyDelete
    Replies
    1. Very informative reply. Thanks for reading and sharing your views. Keep reading

      Delete

माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...