शंभर टक्के उर्जा, हावभावांची प्रचंड विविधता म्हणजे माधुरी. खुल्या दिलाने, अतिशय समरस होऊन नाचणे म्हणजे माधुरी. अशी अनेक बिरुदं माधुरीला आपण तिच्या नृत्याकरिता देऊ शकतो. ज्यांना खरोखर नृत्याची आवड आहे अशा सर्व युवतींनी तिची सर्व नृत्यप्रधान गाणी बघितलीच पाहिजेत.
तिच्या एक, दो, तीन या पहिल्या नृत्यापासून अगदी आताच्या घागरा पर्यंतची सगळी नृत्ये बघितली तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तिची नृत्यातील समरसता. काळानुरूप त्यात तसूभरसुद्धा फरक झालेला दिसत नाही. समरसता या शब्दाची मी इथे फोड अशी करेन, प्रचंड उर्जा + प्रभावी सादरीकरण + हावभावांची प्रचंड विविधता = समरसता. एकाचवेळी या तिन्ही गोष्टींचा अचूक समतोल. गीतातील एका शब्दात तीन ते चार प्रकारचे वेगवेगळे भाव देण्याची करामत ही फक्त तीच करू जाणे आणि यासाठी तिची अनेक नृत्ये उदाहरणादाखल घेता येतील. अखियाँ मिलाऊँ कभी अखियाँ चुराऊ क्या तुने किया जादू या ओळीत काय एक्स्प्रेशन्स दिलेत. थोडं फिल्मी भाषेत बोलायचं तर सुभानल्ला किंवा लाजवाब. ते वाटतात तितके सोप्पे नाहीत. तिचे कुठलेच हावभाव हे अतिरंजित वाटत नाहीत. उलट अतिशय नैसर्गिक आणि तितकेच लाघवी वाटतात. मी तिचे हे नृत्य कित्येकदा बघितले आहे आणि ते हावभाव करून बघण्याचा प्रयत्न देखील केला आहे. जेव्हा जेव्हा ते नृत्य बघते तेव्हा विचार करते की किती रिहलसल्स केल्या असतील यासाठी तिने, का तिला लगेचच जमलं असेल. माहीत नाही पण जे काही केलंय ते ग्रेट आहे.
देवदासमधील मार डाला आणि काहे छेड या नृत्यांनी तर गौरीशंकर गाठलेला आहे. तीस किलोचा घागरा घालून काय शिताफीने नृत्य केलंय तिने. या दोन्ही गाण्यात तिचे भावप्रदर्शन आणि नृत्य यांचा अनोखा मिलाफ बघायला मिळतो. काय ती एका मागोमाग एक भुवया उंचावण्याची अदा, ती रोखलेली नजर, ती चालण्याची अदा मध्येच एखादं स्मित हास्य, मला वाटतं माधुरीने प्रत्येक नृत्याचं सोनंच केलं आहे. मग ते शास्त्रीय असो की पाश्चिमात्य असो, वा हमको आजकल है सारखं कोळी नृत्य असो की मै कोल्हापूरसे आई हूँ ही लावणी असो. त्या त्या नृत्याच्या रंगाढंगात ती रंगून गेली आहे आणि म्हणूनच ती नृत्ये आपल्याही मनाला भिडतात.
प्रभूदेवाबरोबरचं के सरा सरा हे नृत्य एक अजून वेगळाच अनुभव देणारे. असं ऐकलं होतं की प्रभूदेवाबरोबर नृत्य करायचंय असं कळल्यावर तिला खूप टेन्शन आलं होतं. कदाचित प्रभूदेवाच्या वेगळ्या नृत्यशैलीमुळे असेल. पण...पण...पण... त्या नृत्यात दोघांची केमिस्ट्री बघून अचंबित व्हायला होतं. कुठेच, काहीच, कसलीच कमी नाही. हे साधण्यासाठी तिला किती मेहनत घ्यावी लागली असेल याची पूरेपूर कल्पना येते. गाणं स्लो असो नाहीतर फास्ट, नृत्य, अदा आणि हावभाव यांनी दमदार बनवण्याचं कसब आहे तिच्याकडे. तिच्या सगळ्याच्या सगळ्या सिगनेचर स्टेप्स अतिशय प्रसिद्ध आहेत. दिल तो पागल है मधलं माधुरीचं वेगळेपण असंच आपल्याला भावलेलं. काळाप्रमाणे ती स्वतःला बदलवत गेली आणि विशेष म्हणजे तिचे हे बदल प्रेक्षकांनासुद्धा आवडले. म्हणजे असं कधीच वाटलं नाही की हे काही हिला जमलं नाही बुवा. उलट ती ती व्यक्तिरेखा ही तिच्यासाठीच असल्याचं प्रकर्षाने जाणवलं. उगीचच का एम.एफ. हुसैन सारखे जगविख्यात चित्रकार तिच्या या सौंदर्यावर जबरदस्त फिदा झाले होते. त्यांनी म्हणे हम आपके है कौन हा चित्रपट जवळजवळ ६६ वेळा पाहिला होता. त्यांनी तिची अनेक चित्रे रेखाटली आहेत. इतकंच काय तर तिच्याकरीता गजगामिनी या चित्रपटाची निर्मितीही केली होती.
माधुरी दिक्षीत एक मराठमोळ व्यक्तिमत्व स्वाती,आवारा बाप,ऊत्तर-दक्षिण ह्या सिनैमात पाहिल्याचे आठवते का? एन.चंद्रा नामक मराठमोळ्या दिग्दर्शकाचा तेजाब नावाचा सिनैमा १९८९ मध्ये झळकला व त्याबरोबरच एक,दो,तीन हे गीत आणि त्यावर नृत्यदिग्दर्शिका सरोज खानच्या तालावर थिरकणारी मोहिनी अर्थात माधुरी दिक्षीत रातोरात स्टार झाली.पाठोपाठ दिल,साजन व श्रीदेवी ने सोडलेला बेटा सुपरहिट झाला व तिची तुलना नंबर वन अभिनेत्री श्रीदेवी बरोबर होऊ लागली.मी स्वतः श्रीदैवी भक्त असल्याने मला ही तुलना खटकायची. ही तुलना मला सतत विम्बंलडनचा एक काळ गाजवलेल्या मार्टीना नवरातिलोव्हा व स्टेफी ग्राफ ह्यांची आठवण करुन द्यायची. श्रीदेवी सारख्या परिपक्व अभिनेत्री व नृत्याेगना समोर माधुरी नामक नवे वादळ. त्रिदैव,खलनायक,नृत्यप्रधान संगीत,अंजाम,हम आपके है कौन,एकापाठोपाठ एक माधुरीचे चित्रपट यशस्वी-अयशस्वी होत होते,व त्यामधील अभिनय व नृत्य हि बहरत होते.सरोज खान नावाचा परीस स्पर्श जसा श्रीदेवी ला लाभला तसाच माधुरीला ही लाभला व तिनेही त्याचे सोने केले.माधुरीच्या सौंदर्याची तुलना आरसपानी सौंदर्य लाभलेल्या मधुबालाशी केली जायची.मधुबालाचा अभिनय हा तिच्या सौंदर्यापुढे जसा झाकला गेला तसेच काहीसे माधुरीचे झाले. तिच्या अभिनयापेक्षा नृत्याचीच चर्चा जास्त झाली. सिनेमा अयशस्वी असला तरी तिचै नृत्य हमखास यशस्वी असे. सैलाब,खेल,फूल,पापी देवता,100 डेज,लज्जा,प्रेमग्रंथ हे चित्रपट जरी यशस्वी नसले तरी त्यातील माधुरीची गाणी व त्यावरील नृत्य ही एक पर्वणी होती. करीश्मा कपूर सोबतचे डान्स आफॅ एन्वी वरील नव्या ढंगाचे नृत्य,प्रभुदेवा सोबतचे के सेरा सेरा वरील नृत्य किंवा बिरजू महाराजांच्या तालावरील देवदास सिनेमातील नृत्ये अगदी लीलया साकारली आहैत तिने..तिच्या अदा,हावभाव,लटके झटके ह्या तिच्या खासियत आहे. ताई तू म्हटल्याप्रमाणे खरेच तिची सगळी नृत्ये तिने खुप समरसून केली आहेत.जरी मी श्रीदेवीचा चाहता असलो तरी माधुरीच्या नृत्यप्रधान गाणयांनी मला कायम तेवढीच भुरळ घातली होती आणि आजही ती तशीच आहे. म्हणूनच की काय खलनायक मधील चोली कै पीछे हे गाणे मी काॅलेजमधील गॅदरींग मध्ये साकारु शकलो व त्या नृत्यासाठी मिळालेल प्रथम पारितोषिक हे माझ्या आयुष्यातलै नृत्यासाठी मिळालेले पहिली पावती होती.त्यानंतर ओफीस मध्ये देवदास मधील नृत्ये,आजा नचले मधील नृत्य साकारण्याची संधी मिळाली है मी माझे भाग्य समजतौ.अशा ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीची मराठी सिनेमात एंट्री तशी उशिराच झाली. आता सध्या ती डान्स रिएलिटी शोची ज्युरी म्हणून कार्यरत असली तरी तिचे अधिकाअधिक नृत्यप्रधान चित्रपट येवोत व तिचे नृत्य असेच दिवसागणिक बहरत जावो हिच आम्हा नृत्यप्रेमींकडून माधुरीला शुभेच्छा.
ReplyDeleteThanks for the appreciation. Your comments are really motivating. We truly appreciate your response. Thanks a lot and keep reading.
Delete