ता थैय्या ता थैय्या हो हो हो...
श्रीदेवी मी लाडाने तिला चिरीदेवी म्हणायचे, असचं. खूप खूप खूप आवडायची ती मला. तिचा पहिला चित्रपट जरी सोलवा साँवन असला तरी माझ्या मनात तिने घर केलं ते हिम्मतवाला या चित्रपटाने. डफलीवाले नंतर नैनों में सपना हे माझं लक्षवेधी नृत्य ठरायला लागले. या गाण्यात नखशिखान्त नटलेल्या श्रीदेवीला मनाच्या सर्व कोपऱ्यात भरभरून भरून ठेवलं होतं. त्यावेळी पोस्टकार्ड साईजचे अभिनेत्रिंचे फोटो मिळायचे ५० पैशाला एक. घरून खाऊला दिलेल्या पैशातून वाचवून मी तिचे असे असंख्य फोटो घेतले होते जे अजूनही माझ्या संग्रही आहेत. तिच्या मोठ्या नाकावरून शाळेतल्या मैत्रिणी मला खूप चिडवायच्या. खूप राग यायचा मला तिला कुणी काही बोलल्यावर. वर्षांगणिक तिच्या दिसण्यामध्ये आणि अभिनयात होत गेलेल्या बदलांमुळे ती रसिकांच्या मनावर राज्य करू लागली. जवळजवळ ३०० चित्रपट केले असतील तिने. त्यातील नृत्यासाठी गाजलेल्या अनेक चित्रपटांची इथे यादी होऊ शकते. जाग ऊठा इन्सान, नगिना, लम्हें, मि.इंडिया, चाँदनी, चाँद का तुकडा इत्यादी सगळेच चित्रपट एकापेक्षा एक सरस. परंतू तिचे अभिनय आणि नृत्यकौशल्य या दोहोंची बाजी कुठे मारली गेली असेल तर ती चालबाज या चित्रपटात. सहज, सुंदर आणि दिलखेचक नृत्य आणि अभिनयसुद्धा. किसी के हाथ ना आएगी ये लडकी... या गीतावरील नृत्य कितीही वेळा बघितले तरी मन भरत नाही. नृत्यकौशल्याबरोबरच कॉमेडीचा प्रचंड सेन्स. तिने या गाण्यात दिलेल्या कुठल्याही हावभावात अतिशयोक्ती वाटत नाही. इतकं सहज आणि सुंदर. अर्थात याचे तितकंच श्रेय नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनाही जातं. साडी, जीन्स, आम्रपाली, घागराचोळी, गाऊन पेहराव कुठलाही असो तिचे सौंदर्य खुलूनच दिसायचे किंवा प्रत्येक पोशाखातला तिचा वावर हा त्याला साजेसाच असायचा.
मी तिच्या गाजलेल्या सगळ्या गीतांवर नृत्य केलंय आणि नृत्यवर्गांत शिकवलंयसुद्धा. काही गीते तर इतक्या वेळा नाचून झाली आहेत की त्यांची कडवी आणि संगीत तोंडपाठ आहेत. अगदी झोपेतून उठून नाचायला सांगितलंत तरी नाचू शकेन.
या चतुरस्त्र अभिनेत्रीचा दोन वर्षांपूर्वी दुर्दैवी अंत झाला. खूप वाईट वाटले. वयाच्या अवघ्या ५५ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पण तरीही तिचं दिसणं, तिचा अभिनय आणि तिचं नृत्य हे माझ्यासारख्या असंख्य जणींच्या मनात कायमचं घर करून राहिलं आहे.
वाह ताई, श्रीदेवी माझी आॅल टाईम फेवरेट अभिनेत्री..ब्लाॅग मध्ये तु ईतके छान माहीती लिहीली आहेस तिच्याबद्दल त्याला तोड नाही..फक्त एक गोष्ट नमुद करावीशी वाटते ती म्हणजे वैजयंतीमाला, पद्मिनी, रागिणी, वहिदा रेहमान, आशा पारेख, हेमामालिनी, रेखा, जयाप्रदा, मिनाक्षी क्षेषाद्रि, माधुरी दिक्षीत ह्यांच्याप्रमाणे तिचे नृत्याचे शास्रोक्त शिक्षण झाले नव्हते. तरीही तिचे नृत्यातील चपळाई, अदा, हावभाव अप्रतिम असायचे..तुझ्याप्रमाणे मीहि एक तिच्या फोटोंचा अल्बम आणि तिची माहिती असणारी वही बनवली होती..आजही, अगदी आजही तिच्या मुलाखती, तिचे नृत्य यू ट्युब वर बघत असतो..धन्यवाद ताई, जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
ReplyDeleteThanks for sharing your views. Your appreciation will definitely help to write even better.Keep reading and sharing your feedback.
Deleteखूप छान!
ReplyDeleteThanks a lot for your valuable feedback. Keep reading.
DeleteSurekh👌👌👌
ReplyDeleteThanks a lot for your valuable feedback. Keep reading.
Deleteखूपच सुंदर
ReplyDeleteThanks a lot for your valuable feedback. Keep reading.
Deletechan
ReplyDeleteThanks a lot for your valuable feedback. Keep reading.
DeleteGreat Madam ..Keep it up ..Khup chhan vatle .
ReplyDeleteThanks a lot for your valuable feedback. Keep reading.
DeleteHey kavita like to read your blog. Each and every blog story is connected with some or the other in your personal life. Keep writing.
ReplyDeleteThanks a lot for your valuable feedback. Keep reading.
DeleteWell written tribute to dancing superstar Sridevi.
ReplyDeleteThanks for the appreciation. Keep reading.
DeleteShreedevi..... Khartar ti tuzya sathi nrutyachi Devich hoti.... Tuza Nagina madhla dance hi athavtoy.... Khup follow karaychi tu tila..... Mhanje tila pahil ki aamhi bolat ki aali Kavita chi heroine....☺️
ReplyDeleteChhan lihilays
Thanks for sharing your views. Your appreciation will definitely help to write even better.Keep reading and sharing your feedback.
Delete