नृत्यवर्गात बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्य शिकवताना थोडा अडचणीचा भाग असतो तो गाण्यांचा निवडीचा. म्हणजे वयाच्या साडेतीन वर्षांपासून अगदी साठी पार केलेल्या सख्या असल्यामुळे हे थोडेसे अडचणीचे जाते. सर्वांचा जास्तीत जास्त कल हा नवीन गाण्यांवर नृत्य करण्याचा असतो. अर्थात नवीन गाणी प्रगत आणि सुंदर आहेतच. परंतु आजची युवा पिढी जुन्या गाण्यांवर नृत्य करायला बऱ्याच अंशी नाकं मुरडतात. या जुन्या अभिनेत्रिंकडून त्यांनी केलेल्या नृत्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे याचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे लागते. वैयंजतीमाला हे अशाच एका अष्टपैलू अभिनेत्रिंचे नाव... सर्वात जास्त मानधन घेणारी पहिली महिला सुपरस्टार. ही पहिली अभिनेत्री होती जिने भारतीय चित्रपटांतील नृत्याचा दर्जा आणि शैली बदलली तसेच उपशास्त्रीय नृत्याचा बॉलिवूडला परिचय करून दिला. १९५० नंतरच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये आपल्या नृत्याच्या विविध शैली त्यांनी प्रेक्षकांसमोर आणल्या. त्या स्वतः भरतनाट्यम नृत्यांगणा तर होत्याच परंतू नृत्यदिग्दर्शिकाही होत्या.
त्यांच्या चित्रपटातील अनेक गाणी मला नृत्य करायला खुणवायची आणि त्यातल्याच एका गाण्याने कायम माझ्या मनावर अधिराज्य केलंय ते म्हणजे होठोपे ऐसी बात... या गाण्याची जादू कधीच कमी झाली नाही आणि होणारही नाही. एस.डी. बर्मन यांनी संगीताचा अक्षरशः खजाना ओतलाय या गाण्यात. काय वैविध्य दिलंय खरंच अतुलनीय. मी स्वतः या गाण्यावर किती वेळा नाचले असेन याचा हिशोबच नाही. तसेच एक नृत्यदिग्दर्शिका म्हणून विचाराल तर नृत्याच्या विविधतेसाठी प्रचंड स्कोप असलेलं हे गाणं आहे. अशी गाणी नृत्यवर्गात शिकवून विद्यार्थ्यांना नृत्यातील बारीकसारीक बाबी प्रभावीपणे शिकवता येतात. त्यांच्या गाण्यातून मीही नेमके हेच शिकले. स्टेजचा संपूर्ण वापर कसा करायचा, छोट्या छोट्या म्युझिकवर स्टेप्स कशा करायच्या, त्याचबरोबर त्यांना साजेसे हावभाव कसे द्यायचे इत्यादी. आणि याच गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवायला तितकीच जास्त मजा येते. अर्थात अगदी लहान विद्यार्थी त्यासाठी सक्षम नसतात.
होठोपे ऐसी बात हे गाणं ऐकलंय की एका सिंगल शॉटमध्ये शूट केले गेले होते. बापरे ८.१५ मिनिटांचे गाणे एका शॉटमध्ये. सोपी गोष्ट नाही आहे ही. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अशा बऱ्याच आव्हानात्मक गोष्टी केल्या आहेत. आम्रपालीमधील त्यांची सर्व नृत्ये त्याचबरोबर संगममधील मैं का करू राम मुझे बुढ्ढा मिल गया... या गाण्यात तर त्याकाळी म्हणजे १९६४ साली वेगवेगळ्या वेस्टर्न कॉस्च्युममध्ये त्यांनी आपण वेगळ्या धाटणीचे नृत्यही करू शकतो हे लिलया दाखवले होते. पुढेपुढे देश विदेशात नृत्यांचे भरपूर कार्यक्रम करून आपल्या नृत्यकलेचा प्रसारही तितक्याच प्रभावीपणे केला. अशा या वैयजंतीमाला ज्या स्वतः भरभरून नृत्य जगल्या आणि आमच्यासारख्या अनेकींना ते जगायला शिकवलं.
वाह खुप छान, सुप्रसिध्द अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला ह्यांच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे..दक्षिणेतुन आलेल्या ह्या अभिनेत्रीने त्यांच्या अभिनय व अप्रतिम नृत्याने सगळ्यांची मने जिंकली होती.ज्वेलथीफ मधील होठों पे ऐसी बात,कठपुतली मधील बागड बम बम बाजे डमरु, डाॅ विद्या मधील पवन दिवानी,प्रिन्स मधील हेलन बरोबरची नृत्याची चुरस,आम्रपाली मधील सहकलाकारा बरोबरील नृत्य, राजतिलक मधील पद्मिनी बरोबरची नृत्याची चुरस हे नृत्यप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे..
ReplyDeleteThanks for sharing your views. Your appreciation will definitely help to write even better.Keep reading and sharing your feedback.
DeleteAnother dancing great. Very expressive actress. Her facial expressions while acting were extension of her dancing skill. Her mai kya karu ram mujhe buddha mil gaya is my favorite song.
ReplyDeleteThanks for reading our blog. Keep reading and sharing your views.
Delete