खरंच लाजवाब असं व्यक्तिमत्व लाभलेल्या वहीदा रहमान भरतनाट्यम नृत्य शिकलेल्या आहेत. त्यांचे नृत्य बघून गुरुदत्त यांनी त्यांना फिल्म अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला. सीआयडी या चित्रपटातून त्यांचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले. त्यांच्या चित्रपटांतील अनेक गाणी नृत्यासाठी लक्षवेधी ठरलेली आहेत.
साधारण २००४ ची गोष्ट असेल मी ठाण्यात पहिल्यांदा गृहिणी आणि कामावर जाणाऱ्या स्त्रियांसाठी बॉलिवूडच्या नृत्यप्रशिक्षणाची बॅच सुरु केली होती. ज्यांना लहानपणी नृत्य शिकता आलं नाही किंवा परिस्थिती, जबाबदारी, मुलं या सगळ्यात अडकल्यामुळे नृत्याकडे पाठ फिरवावी लागली अशा माझ्या मैत्रिणींसाठी पुन्हा एकदा नृत्य शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी हा प्रयत्न होता. योगायोगाने याबद्दलची बातमी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात छापून आली होती आणि त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात नृत्याची आवड असलेला महिला वर्ग एकत्रित झाला होता.
या सर्व महिलांचा नृत्य शिकताना सर्वात जास्त कल हा जुन्या गाण्यांकडे असायचा आणि आजही असतो. त्यांना अनेक जुन्या अभिनेत्रिंची गाणी मी शिकवते. त्यामध्ये वहीदाजींची पिया तोसे नैना लागे रे, मोसे छल किये जाय, काँटोसे खिंचके आँचल, पान खाए सैया हमारो या गाण्यांवर कित्येक महिलांना घेऊन कित्येकदा नृत्य बसवले आहे. महिलांना या गीतांवर नृत्य करायला खूप आवडते. विशेष करून पिया तोसे नैना लागे रे हे गाणं खूप भावतं. त्यांचा पान खाएँ सैय्या या गाण्यावर सुद्धा वेगवेगळ्या वयोगटात अनेकदा नृत्य बसवले आहे. २००३ साली आठ वर्षांची प्रिया विनोद ही विद्यार्थिनी स्टार प्लसवरील क्या मस्ती क्या धूम या कार्यक्रमात पान खाए सैय्या या नृत्याची विजेती ठरली होती.
वहीदाजी मला कोणत्याही पेहरावात नृत्य करताना आवडायच्या. चेहऱ्यावरील आपल्या प्रभावी हावभावातून त्यांनी प्रत्येक गाण्याला न्याय दिला आहे. कहींपे निगाहे कहींपे निशाना भँवरा बडा नादान, जाने क्या तूने कहाँ ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांना १९७२ साली त्यांना पद्मश्री तर २०११ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. अशा या अभिनेत्रिला आम्हा सर्व नृत्यसख्यांकडून त्रिवार अभिवादन.
खुप छान,वहिदाजी खरोखरच नृत्य आणि अभिनयाच्या बाबतीत चौदहवी का चाँद होत्या.१९९१ साली प्रदर्शित झालेल्या लम्हे चित्रपटात त्यांनी परत एकदा त्यांच्याच गाजलेल्या काटों से खींच के ये आँचल ह्या गाण्यावर नृत्याची झलक दाखवुन प्रेक्षकांना थक्क केले होते.अशा ह्या चतुरस्न अभिनेत्रीचे व्यक्तीमत्व उलगडवल्याबद्दल धन्यवाद..
ReplyDeleteWe thank you for the appreciation. We are honored and these words are very inspiring. thanks so much.
ReplyDeleteVery respectful personality. Ideal woman. I loved her in Paan khaaye sainya hamaro.
ReplyDeleteVery true. She was an elegant actress. We thank you for sharing your valuable feedback. Keep reading our blog.
Delete