Monday, 20 April 2020

मोनिका माय डार्लिंग...


नृत्यप्रेमींच्या डार्लिंग राहिल्या आहेत हेलनजीं...मी तर त्यांना नृत्यबिजली म्हणेन. देखणं व्यक्तिमत्त्व, कमनीय आकृतीबंध बांधा, प्रचंड लवचिकता, भरपूर ऊर्जा आणि त्या त्या नृत्याकरिता त्यांनी दिलेला त्यांचा प्रामाणिकपणा मला भावत राहिला. जी नृत्ये त्यांनी केली त्या नृत्यांना त्यांनी शंभर टक्के न्याय दिला, यात कुणाचंच दुमत नसावं.  
दुसऱ्या महायुद्धादरम्यान वडिलांच्या निधननानंतर त्यांचे बालपण अतिशय गरिबीत आणि कष्टात गेले. त्यांच्या आईची मैत्रिण कुक्कूजी चित्रपटसृष्टीत डान्सर आणि अभिनेत्री होत्या. त्यांच्यामुळे हेलन यांना चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळालं. ५०च्या दशकात त्यांना हळूहळू सोलो डान्स मिळायला सुरुवात झाली. वयाच्या १९व्या वर्षी त्यांना मेरा नाम चिन चिन चूँ...या गाण्यावर नृत्य केले आणि तिथून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अंदाजे ७००हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. ६०च्या दशकात आलेली त्यांची सगळी गाणी ही गाजलेली तर होतीच पण नृत्यप्रधानही होती. खूप मन करायचे त्या गाण्यांवर आपणही ताल धरावा. परंतू त्यांची प्रतिमा कॅब्रे डान्सर म्हणून असल्यामुळे त्या काळात त्यांच्या गाण्यांवर नृत्य करायची हिंमत व्हायची नाही. त्यांनी घातलेले पेहराव हे शरीर प्रदर्शन करणारे असल्यामुळे त्या नृत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. कारण तो काळच तसा होता.
माझ्या नृत्यवर्गात कित्येकदा त्यांच्या मुंगडा मुंगडा या गाण्यावर नृत्य शिकवण्यासाठी आग्रह धरला जायचा. परंतू मी तो सफाईपूर्वक टाळायचे आणि एक दिवस असा आला की स्टार प्लस चॅनलवरील डान्स शोसाठी चॅनलने मला याच गाण्यावर नृत्य बसवायला अनिवार्य केले. मग काय नृत्य दिग्दर्शनातील कसब वापरून गाण्यातील काही शब्दांना बगल देऊन मी ते बसवले आणि त्या स्पर्धेत बाजीही मारली.
तिथून मी आणि माझा दृष्टिकोन थोडा बदलला. एखाद्या गीतातला, संगीतातला आणि नृत्यातला प्रामाणिकपणा भावला असेल तर ती कला तुम्ही तुमच्या कुवतीने प्रभावीपणे रसिकांसमोर आणू शकता. यामुळेच त्यांची काही नृत्ये हळूहळू माझ्या कार्यक्रमात सादर होऊ लागली. दोन वर्षांपूर्वी आशा भोसले यांच्या गाण्यांवर केलेल्या कार्यक्रमात हेलन आणि आशा भोसले यांचं समीकरण टाळणं शक्यच नव्हतं. त्यांच्या कितीतरी गाण्यांवर नृत्ये बसवली आणि तीसुद्धा महिला बॅचवर. या सर्व नृत्यांना महिलांच्या घरुन प्रचंड वाहवा मिळाली होती आणि इथे मला काळ बदलला असल्याचे जाणवले.
हेलन यांना १९८० साली फिल्मफेअर तर १९९९ साली लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार प्राप्त झाले होते. पण खरंच त्यांची नृत्ये ही लाईफटाईम अचिव्हमेंट तर होतीच परंतू ती लाईफटाईम मेनोरेबल पण राहतील.



4 comments:

  1. सुरेख, हेलनजींबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे.कॅबरे,कव्वाली,लोकनृत्य कोणत्याही प्रकारचे नृत्य असो हेलनजी तै लीलया साकारायच्या. ब्लाॅकबस्टर शोले मधील मेहबुबा मेहबुबा,तू मुंगडा मुंगडा,आ जाने जा,ये मेरा दिल,वुई मा वुई मा,ओ हसीना जुल्फोंवाली अशी कित्येक गाणी हेलनजी ह्यांनी आपल्या नृत्याने अजरामर कैली आहैत. पिया तु अब तो आजा गाण्यातील आशाताईंचा भारदस्त तसाच मादक आवाज व पिसे लावलेली हैलन हे जणू अफलातुन जुळुन आलेले समीकरणच होते ज्याला आजही तोड नाही. ९० च्या दशकात आलेला खामोशी द म्युझिकल या चित्रपटातील त्यांचा अभिनय व गाते ते पहेले अकेले ह्या गाण्यावरील नृत्य पाहणे म्हणजे हेलनजींच्या चाहत्यांसाठी पर्वणीच होती. अशा ह्या नृत्यबिजलीचे नृत्यपैलू उलगडल्याबद्दल तुझे धन्यवाद ताई..

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for sharing your views. Your appreciation will definitely help to write even better.Keep reading and sharing your feedback.

      Delete
  2. Electrifying dancer, Queen of Cabaret dancing, Danced every time with complete passion. Today people call such songs as item numbers but Helanji performed them without giving any touch of vulgarity. Nobody can recreate that magic on screen what she created in her era. She is the one & only in her form of dancing. Ye mera dil yaar ka diwana is my favorite.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for sharing your views on such lovely actress and her dance style. Keep reading our blog and give us feedback.

      Delete

माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...