Tuesday, 21 April 2020

सायोनारा गर्ल...आशा पारेख


हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांचे नाव मोठ्या गर्वाने घेतले जाते अशा अभिनय आणि नृत्यात पारंगत असलेल्या अभिनेत्री आशा पारेख. आईवडिलांची एकुलती एक मुलगी असलेल्या आशा पारेख या कथ्थक नृत्य शिकलेल्या आहेत. नृत्याची प्रचंड आवड असलेल्या आशाजींना डॉक्टर होण्याची इच्छा होती. चित्रपट निर्माते बिमल रॉय यांनी त्यांना आपल्या चित्रपटात बालकलाकार म्हणून घेतले होते. त्यांना बेबी आशा म्हणून बोलवायचे. त्यांनी त्यावेळच्या देवानंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, धर्मेंद्र अशा सर्व टॉपच्या हिरोंबरोबर काम केली आहेत.
माझ्या नृत्यवर्गात येणाऱ्या महिलावर्गात कुणी गृहिणी असते तर कुणी शिक्षिका कुणी डॉक्टर तर कुणी परिचारिका तसेच ऑफिसला जाणाऱ्यांचाही खूप मोठा वर्ग आहे. जेव्हा नवीन नवीन ही महिला बॅच सुरु झाली तेव्हा सुरुवातीला त्यांच्या अनेक प्रश्नांना मला सामोरे जावे लागले होते. उदा. आम्हाला नृत्य जमेल का, काही शारिरीक अडचणी तर नाही येणार ना, कुणी हसणार तर नाही ना, विचित्र तर दिसणार नाही ना असे एक ना अनेक. त्यांच्यातील हरवलेला आत्मविश्वास म्हणा किंवा त्यांच्या मनाला नव्याने उभारी देण्यासाठी मला खूप प्रयास करावे लागले. सतत त्यांना बोलून, समजावून, धीर देऊन नृत्यकलेची आवड आणि महत्त्व पुन्हा एकदा त्यांच्या मनात रुजवायला लागले होते. या महिला विशेष बॅच सुरु झालेल्या सोळा वर्षांच्या काळात मी आशा पारेख यांच्या असंख्य गीतांवर नृत्ये बसवली आहेत. काँटा लगा, रात का समाँ, पर्दे में रहने दो, छायी बरखा बहार या त्यांच्या गाण्यांना महिलांची प्रथम पसंती असते. याशिवाय माझ्या कार्यक्रमात त्यांचे अनेक ड्युएट्स पण बसवले आहेत. ज्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आजा आजा में हूँ प्यार तेरा, दिल देके देखो, अब आन मिलो सजना, बडे है दिलके काले, आज ना छोडेंगे या गाण्यांवर नृत्य करायला बहार येते. चुनरी सँभाल या गाण्यावर दूरदर्शनवरील दमदमादम या कार्यक्रमात स्पेशल परफॉर्मन्स झाला होता. वेगवेगळ्या रंगांच्या भरपूर ओढण्या घेऊन हे नृत्य बसवले होते. तसेच त्यांच्या कोई मतवाला आया मोरे द्वारे, छोडो ना मोहे कान्हा, चुनरी मोरी कोरी या भावप्रधान गीतांवर सुद्धा पावलं थिरकायला लागतात.
पुढे चित्रपट क्षेत्राला अलविदा केल्यावर त्यांना काही टीव्ही सिरिअल्स बनवल्या. मुंबईत आशा पारेख हॉस्पिटलची स्थापना करून त्यांनी आपले डॉक्टर बनण्याचं स्वप्नं एका वेगळ्या अंदाजाने पूर्ण केले. अशा या आशा पारेख ज्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत गीत, अभिनय आणि नृत्य संपन्न असलेल्या भरपूर भूमिका साकार करायला मिळाल्या होत्या. त्यांच्या गाण्यांना आणि नृत्यांना आमची नेहमीच पहिली पसंती होती आणि ती राहणारच.  


6 comments:

  1. छान,आशा पारेख ६०-७० च्या दशकातील सुप्रसिध्द अभिनेत्री व नृत्यांगना.ज्युबीली गर्ल म्हणून पण त्या ओळखल्या जायच्या.ताई तु उल्लेख केलेल्या त्यांच्या गाणी व त्यावरील आशाजींचे अप्रतिम नृत्य पाहणे ही नृत्यप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. माझी ही सगळी गाणी आवडती तर आहेच, त्यात आणखी एका गाण्याचा खास उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे कारवाँ चित्रपटातील दैय्या ये में कहां आ फसीं हे विनोदी गीत व त्यावरील आशाजींचे धमाल नृत्य. बाजे पायल नामक एक हिंदी मालिका ज्यात हिंदी चित्रपटातील नृत्य व नृत्यांगना अभिनेत्री ह्यांचे विविध पैलू उलगडले होते. धन्यवाद ताई...

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for sharing your views. Your appreciation will definitely help to write even better.Keep reading and sharing your feedback.

      Delete
  2. मँडम खूप छान वाटले,वाचून आशा पारेख यांविषयी. तुम्ही सुरेख दिसत आआहात.

    ReplyDelete
  3. Good to know impact of all these wonderful actresses in your journey.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot. All the actresses are very inspiring in my Dance career. We thank for reading our blog. Keep reading and give your valuable feedback.

      Delete

माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...