Thursday, 23 April 2020

रेखीव रेखा


तामीळ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार जेमिनी गणेशन यांची मुलगी भानू रेखा गणेश म्हणजेच आपली बॉलीवूडची रेखा. साँवन भादो या चित्रपटातून पदार्पण केलेल्या रेखा यांना सुरुवातीला त्यांच्या डस्टी लूकमुळे तितकेसे कुणी पसंत केले नव्हते. परंतु अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आलेला दो अंजाने हा चित्रपट त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. चित्रपटसृष्टीत ग्लॅमगर्ल म्हणून त्यांच्यावर शिक्का बसलापरंतु १९७८ साली आलेल्या घर या चित्रपटानंतर त्यांची प्रतिमाच बदलून गेली आणि तिथून त्यांना चांगल्या अभिनेत्रीचा दर्जा मिळायला सुरुवात झाली.
पुढे त्यांना मुज्जफर अली यांचा उमराव जान, श्याम बेनेगल यांचा कलियुग आणि गिरीश कर्नाड यांचा उत्सव अशा दिग्गजांच्या चित्रपटात भूमिका मिळाल्या. एखाद्या चित्रात रेखाटल्याप्रमाणे असलेला त्यांचा रेखीव चेहरा हा त्यांच्या नावाला अगदी साजेसा आहे. त्यांची नृत्यातली अदाकारी ही लाजवाब असायची.
परदेसियाँ ये सच है पिया, सुन सुन दीदी या गाण्यातील त्यांचा अवखळ आणि नटखट अभिनय खूप छान होता. परिणीतामधील कैसी पहेली है ये जिंदगानी हे लालबुंद साडीतील नृत्यही प्रचंड आकर्षक होतं. जाबाँजमधील प्यार दो प्यार लो हा क्लब डान्सही तितक्यात आत्मविश्वासाने केला होता. सलामें इश्क, दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्ती में या त्यांच्या गाण्यातील अदा आणि नजाकत याबद्दल काय बोलावे. बैठ्या नृत्यात किंवा संथ गतीच्या गाण्यात सुद्धा प्रभावी भावप्रदर्शनाने प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या अभिनेत्रीमध्ये कमालीचे होते.
भुवया आणि डोळ्यांच्या आकर्षक हालचाली आमच्यासारख्या नृत्यांगणांना खूप काही शिकवून जातात. त्यांच्या नृत्यातील आर्जवता तर आपल्याला प्रेमातच पाडते. पण त्याचबरोबर त्यांचे ठुमकणे, लचकणे आणि ठेका धरणे हेसुद्धा नृत्यातील सहजता दाखवून देतात.
मला असं वाटत प्रत्येक नृत्य शिकणाऱ्या विद्यार्थिनीने एक अभ्यास म्हणून ही त्यांची नृत्ये आवर्जून बघावीत. नृत्य ही केवळ जलद गतीच्या गाण्यांवरच नाचण्याची कला नाही आहे. संथ गतीच्या गाण्यावर प्रभावी नृत्य करणेही तितकंच आव्हानात्मक आहे. रेखा यांच्या नृत्यातून या गोष्टी भरपूर प्रमाणात शिकायला मिळतात. म्हणजे कितीही वेळा ही नृत्ये बघितली तरी आहाहाः हे शब्द आपोआपच निघतात.
पिया बाँवरी हेसुद्धा असेच एक प्रभावी नृत्य. यात कथ्थक नृत्यातील तोडे, कवित्त आणि भावांग त्यांनी लीलया पेलले आहे. अशा या रेखा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वातला उत्साहीपणा आणि ऊर्जा यामुळे त्या आजही तितक्याच चिरतरूण दिसतात. 


6 comments:

  1. भानूरेखा गणेशन म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री रेखा..वडील दक्षिणेचे सुपरस्टार जेमिनी गणेशन व आई पुष्पावल्ली अम्मा ह्यांचे हे कन्यारत्न. सुरवातीच्या काळात थोड्या स्थूल असलेल्या रेखाने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून दक्षिणेतून आधीच येऊन स्थापित झालेल्या वैजयंतीमाला, पद्मिनी, रागिणी, जयललिता, हेमा मालिनी ह्यांच्या सारख्याच आपण ही अभिनय व नृत्य ह्यामध्ये तितक्याच पारंगत आहोत हे दाखवून दिले. सिकंदरची जोहरा, ऊमरावजान ची अमिरन म्हणजेच ऊमराव अदा, ऊत्सव मधील वसंतसेना, मि. नटवरलाल मधील शन्नो, खुबसूरत मधील अवखळ मंजू, घर मधील आरती, ईजाजत मधील सुधा, खून भरी माँग मधील आरती व ज्योती अशा कित्येक भुमिका त्या अक्षरक्षः जगल्या आहेत..कुठं कुठं जायाच हनिमूनला ह्या मराठमोळ्या लावणीवर अप्रतिम नृत्य साकारुन त्सांनी मराठी रसिकांना थक्क केले होते..दिल चीज क्या है म्हटल्यावर जेवढ्या चटकन आशाताई डोळ्यासमोर येतात तेवढ्याच पटकन रेखाही येते.. त्यांनी त्या भुमिकेचे अक्षरक्षः सोने केले आहे..दुसर्या कोणीही के धाडस करुच नये. कांजीवरम साडी, सैलसर वेणी किंवा कानावर रुळणारा सैल आंबाडा, पौर्णिमेच्या पुर्ण चंद्रासारखा ठसठशीत कुंकवाचा टिळा आणि भरभरुन बांगड्या व दागिने म्टले की रेखाच.. टाईमलेस ब्यूटी, ईटर्नल दिवा, लेडी देवानंद अशा एक ना अनेक ऊपाध्या लाभलेली रेखा आजही कित्येक तरुण- तरुणींचा आदर्श आहेत..

    ReplyDelete
    Replies
    1. Such a lovely feedback and the review. We thank you for reading our blog. Keep reading.

      Delete
  2. Yes you are right Kavita. Rekhache Dance kitihi vela pahile tari sarkhe pahavese vattey. Well written and you too have done a excellent choreography on umrao Jaana songs. Keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot Shilpa. Your feedback is much appreciated. Thanks for reading our blog.

      Delete
  3. Naturally talented actress. Did some memorable dances as you mentioned. Not sure whether she was a trained dancer but whatever she did onscreen was nothing short of magic.

    ReplyDelete
    Replies
    1. Really Talented Actress. We thank you for reading our blog and give us a feedback. Keep reading

      Delete

माझ्या आठवणीतील होळी

  होळी, होरी, हवली, शिमगा अशा अनेक नावांनी सजलेला अतिशय धार्मिक आणि तितकाच मस्तीचा, आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा असलेला हा सण लहान थोरांपर्यंत स...